कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा
नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर …